राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर भाजपचा झेंडा नसल्याचे राजकीय तर्कवितर्क

Foto
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर भाजपचा झेंडा नसल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. श्रीरामपूर येथे काल, मंगळवारी विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालं. मात्र, कार्यक्रमात कुठेही भाजपचा झेंडा दिसला नाही. एवढेच नाही तर कार्यालयावरूनही भाजपचा झेंडा गायब होता.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. विखे पाटल यांनी स्वत: कार्यालयाचे उद्घाटन केलं. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपच्या गोटात सामील झाले होते. भाजपच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी मिळवली होती. मात्र, राज्यात भाजपाची सत्ता न आल्याने कदाचित त्यांचा हिरमोड झाला आहे. श्रीरामपूर येथे विखे पाटलांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. मात्र भाजपाचा झेंडा कुठेही दिसला नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे कार्यक्रम स्थळी लावलेला एक फ्लेक्स लक्ष वेधून घेत होता. ज्यात "चलो एक पहल की जाए... नए रस्ते की ओर " असं लिहिलेलं असल्याने, त्याचा नेमका अर्थ काय यावरून आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker